Ad will apear here
Next
युनियन बँक ऑफ इंडियातर्फे तीन नव्या योजना
१०१वा स्थापना दिन साजरा
युनियन बँक ऑफ इंडियाच्या १०१ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय अर्थसचिव राजीव कुमार, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय आदी

मुंबई : देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना शतकाहून जास्त काळ सर्वसमावेशक बँकिंग सेवा देणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने सोमवारी १०१वा स्थापना दिन साजरा केला. या वेळी या बँकेतर्फे तीन नवीन सुविधा दाखल करण्यात आल्या. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व ग्रामीण आणि निमशहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असे ‘युनियन संपूर्ण’, ‘ई-वे बिल्स’ ही इनव्हॉइस वैधता सेवा आणि मोबाइल बँकिंग अॅप ‘यूमोबाइल’मध्ये एटीएमची चालू स्थिती प्रदान करणारी ‘एटीएम जियो लोकेटर’ या सेवांचा यात समावेश आहे. 

या कार्यक्रमास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय अर्थसचिव राजीव कुमार आणि युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण रायही या वेळी उपस्थित होते.

अनुराग ठाकूर म्हणाले, ‘नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीच्या काळात पद्धतशीर, कार्यक्षम आणि पारदर्शक बँकिंगची आवश्यकता असून, युनियन बँक ऑफ इंडियाने या संदर्भात एक मानदंड निश्चित केला आहे.’

वित्त सचिव राजीव कुमार म्हणाले, ‘युनियन बँक ऑफ इंडियासाठी ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि ही संधी साधून यापुढील काळात आणखी दैदिप्यमान उंची गाठण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे. ग्राहकांच्या हितासाठी विविध नवीन उत्पादने सादर करण्यात युनियन बँक ऑफ इंडिया आघाडीवर आहे आणि आता ती बँकिंग उद्योगात अव्वल स्थान मिळविण्याच्या दृष्टीने विस्तार करण्याच्या मार्गावर आहे.’


युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण म्हणाले, ‘युनियन बँकेला उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला, नव मध्यमवर्गीय आणि दुर्बल घटकांची पिढ्यानपिढ्या स्वप्ने साकार केल्याचा अभिमान आहे. आमच्या शंभर वर्षाच्या प्रवासात बँक सामाजिक उत्थान, समुदाय सेवा आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमात अर्थपूर्ण योगदान देत आहे. युनियन बँक ही न्यू इंडियाची सर्वाधिक पसंती असलेली बँक बनण्यास सर्वथा योग्य आहे. हा महत्त्वाचा टप्पा आमचे मूलभूत सिद्धांत अबाधित राखून नवकल्पनांचा अवलंब करण्याच्या अथक प्रयत्नांचा पुरावा आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZWQCG
Similar Posts
‘एआयआयबी’ची भारतात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) भारताला आतापर्यंत सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा अर्थपुरवठा केला आहे. बँकेने भारतातील गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला आहे.
मानवी साखळीतून सनदी लेखापालांना मानवंदना पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागाच्या वतीने ‘सीए’च्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सायरस पूनावाला यांना बिल गेट्स यांच्या हस्ते ‘आयसीएमआर’ पुरस्कार प्रदान पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना नुकताच प्रतिष्ठित ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कार’ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
‘किर्लोस्कर’ला सर्वोत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीला यंदाचा ‘सीआयआय एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी डीझेल इंजिन, जनरेटर्स क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. बेंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या २७ व्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language